Railway Update News : कोकण मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे. आठवड्याच्या शेवटी तसेच सुट्टीच्या कालावधीत प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे महामंडळाने विशेष रेल्वे गाड्या चालवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे मुंबई–गोवा मार्गावर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
कोकण रेल्वेकडून गाडी क्रमांक ०११२९/०११३० लोकमान्य टिळक टर्मिनस–मडगाव जंक्शन–लोकमान्य टिळक (ट) ही विशेष रेल्वे २५ जानेवारी २०२६ पासून सुरू करण्यात येणार आहे.
गाडी क्रमांक ०११२९ ही विशेष रेल्वे रविवार, २५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री १२ वाजता मडगाव जंक्शन येथे पोहोचेल. तर परतीची गाडी क्रमांक ०११३० ही २५ जानेवारी रोजी दुपारी २.३० वाजता मडगाव जंक्शन येथून सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे ४.०५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. Railway Update News
ही विशेष रेल्वे ठाणे, पनवेल, पेन, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबणार आहे.
या गाडीची डब्यांची रचना एकूण १८ डब्यांची असून त्यामध्ये २ टायर एसीचा १ डबा, ३ टायर एसीचे ३ डबे, स्लीपरचे ८ डबे, जनरलचे ४ डबे आणि एसएलआरचे २ डबे असणार आहेत. Railway Update News
या विशेष गाड्यांमुळे कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना, पर्यटकांना आणि स्थानिक प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून प्रवास अधिक सुलभ होणार आहे.