सोन्या-चांदीच्या दरांनी गाठला उच्चांक, गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकता वाढली. Gold–Silver Price Hike
Gold–Silver Price Hike : सध्या देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर सोन्या-चांदीच्या किमतीत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. ही वाढ सर्वसामान्य ग्राहकांपासून ते मोठ्या गुंतवणूकदारांपर्यंत सगळ्यांसाठीच आश्चर्याची बाब ठरत आहे. शेअर बाजारातील सततची चढ-उतार, जागतिक राजकीय तणाव, युद्धजन्य परिस्थिती आणि वाढती आर्थिक अनिश्चितता यामुळे सुरक्षित गुंतवणुकीकडे लोकांचा कल वाढला आहे. याचा थेट फायदा सोने आणि चांदीसारख्या मौल्यवान धातूंना होताना दिसतोय.
हे ही वाचा…...
रेल्वे प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी दिलासा, जाणुन घ्या मोठी माहिती.
आठव्या वेतन आयोगापूर्वी सरकारने कर्मचाऱ्यांचे वाढवले पगार, पेन्शनमध्येही वाढ , किती होणार फायदा?
यांची नावे राशन कार्डमधून काढून टाकली जानार, पहा संपूर्ण माहिती.
गेल्या दीड वर्षांपासून सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. मात्र, अलीकडच्या काही महिन्यांत चांदीच्या किमतीत झालेली मोठी झेप विशेष लक्षवेधी ठरली आहे. काही महिन्यांपूर्वी भारतात चांदीचा दर सुमारे २ लाख रुपये प्रति किलो इतका होता. तो आता थेट ३ लाख रुपये प्रति किलो या पातळीवर पोहोचला आहे. त्यामुळे चांदीने आतापर्यंतचे सर्व उच्चांक मोडीत काढले आहेत. Gold–Silver Price Hike
या दरवाढीचा परिणाम गुंतवणूक पद्धतींवरही दिसून येतोय. पारंपरिक सोन्यासोबतच आता चांदीकडेही गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात वळताना दिसत आहेत. सोन्या-चांदीवर आधारित म्युच्युअल फंड्स आणि ईटीएफ (ETF) मध्ये गुंतवणूक वाढल्याचे आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
यांची नावे राशन कार्डमधून काढून टाकली जानार, पहा संपूर्ण माहिती. Ration card update
दरम्यान, मेदिनी ज्योतिषशास्त्रानुसारही सोन्या-चांदीच्या किमतींवर ग्रहस्थितीचा परिणाम होत असल्याचे मानले जाते. ‘बृहत् संहिता’ या ग्रंथानुसार गुरु आणि सूर्य हे सोन्याचे कारक ग्रह असून शुक्र ग्रहाचा संबंध चांदीशी आहे. सध्या गुरु ग्रह शत्रू राशीत गोचर करत असल्याने मौल्यवान धातूंमध्ये तेजी दिसून येत आहे. तसेच मीन राशीतील शनीचा प्रभाव आणि आगामी काळातील मंगळाचा गोचर यामुळेही किमतींना आधार मिळत असल्याचे ज्योतिषतज्ज्ञ सांगतात. Gold–Silver Price Hike
याशिवाय पूर्णिमा, अमावस्या आणि सूर्य संक्रांतीच्या काळात घडणाऱ्या जागतिक घटनांचा वस्तूंच्या किमतींवर परिणाम होतो, असेही ज्योतिषशास्त्रात नमूद करण्यात आले आहे. अलीकडील जागतिक घडामोडींमुळे सोने-चांदीला सुरक्षित गुंतवणूक म्हणून अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
तज्ज्ञांच्या मते, १ जूननंतर गुरु ग्रह उच्च राशीत प्रवेश केल्यानंतर सोन्या-चांदीच्या किमतीत काहीशी नरमाई येण्याची शक्यता आहे. मात्र, सध्याच्या अस्थिर आर्थिक वातावरणात या धातूंवरील दीर्घकालीन विश्वास कायम राहण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे गुंतवणूक करताना केवळ ज्योतिषीय अंदाजांवर न विसंबता आर्थिक परिस्थितीचा अभ्यास करून आणि तज्ज्ञांचा सल्ला घेऊन निर्णय घेणे अधिक योग्य ठरेल. Gold–Silver Price Hike